
मंडणगड : धुत्रोली हनुमानवाडी येथील सरस्वती सुखदरे ( वय - ७४) या महिलेच्या घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याचे २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावत मंडणगड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने अतिशय कौतुकास्पद कामगीरी केली आहे. अज्ञात चोराच्या विरोधात वृध्द महिलेच्या घरातील 3 लाख 33 हजार रुपयांचे सोन्याचे चार तोळे इतक्या वजनाचे दागिने व 1 हजार रुपये रोख रक्कम हा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार 15 ऑक्टोंबर 2025 रोजी दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलीस पथक युध्द पातळीवर कामास लागले. गुन्ह्यांच्या तपासाच्या सर्व पध्दतीचा अवलंब केला. चोरी झालेल्या परिसराची कसुन तपासणी केली व संशयीत व्यक्तीची गुप्त माहीती घेण्यास सुरुवात केली. या संदर्भात पोलीस दलाचे श्वान पथकासही घटनास्थळी बोलावले होते. पोलीसांनी बोटाचे ठसे व अन्य परिस्थितीजन्य पुरावे गोळा करत मुख्य संशयीत विनोद सुगदरे वय (40) राहणार धुत्रोली याच्या संशयीत हलाचालीवल लक्ष ठेवले व (17) ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्याचे धुत्रोली येथील गावातील घरात चोरीच्या मुद्देमालासह रेडहँड पकडत घरफोडीत चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल व चोर या दोघानांही ताब्यात घेत गजाआड केले.
पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार दत्ताराम बाणे, पोलीस नाईक संजय बारगूडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संबंधदास मावची, पोलीस हवालदार विशाल कोळथरकर गुप्तवार्ता विभागाचे विनय पाटील. पोलीस पाटील राकेश पोतदार, पोलीस पाटील नूरहसन कडवेकर, पोलीस पाटील रमेश जाधव यांनी यांनी तपास कारवाईत सहभाग घेतला.
मंडणगड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घऱफोडीतील चोराचा छडा लावत केलेल्या कामगीरीबद्दल पथकात सहभाही सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे तालुक्यातून कौतूक होत आहे. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी एस. सणस यांनीही पोलीस स्थानकास भेट देत या प्रकरणाची सखोल माहीती घेतली.