
मंडणगड : महावितरण कंपनीच्या जागेतील खैर चोरणारे शिवाजी जाधव राहणार भिंगळोली आदीवासी वाडी व अन्य दोन अज्ञात इसम यांचे विरोधात 20 ऑगस्ट 2025 रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपकेंद्र दापोली फाटा येथील महावितरण ऑफिसचे यंत्र चालक गणेश चौगुले वय (48) यांनी या चोरीबद्दल पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार हे महावितरण ऑफिस 33/11 के.व्ही. मंडणगड उपकेंद्र भिंगळोली दापोली फाटा येथे कामावर असताना ऑफिसच्या बाजूला असलेल्या व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत यांचे नावे असलेल्या जमीन सर्वे नंबर-2/ल या शासकिय जमिनीमध्ये यातील आरोपीत यांनी प्रवेश करुन जागेत असलेली खैराच्या झाडापैकी लहान मोठी 4 ते 5 झाडे तक्रारदार यांच्या संमतिशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली आहेत.
या झाडांची किंमत सात हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पोलीस स्थानकात नोंदविलेल्या फिर्यादीनंतर पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 42/2025 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303(2),3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करुन घेत पुढील तपास सुरु देव्हारे येथे सार्वजनीक ठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्याचे विरोधात बाणकोट पोलीस गुन्हा नोंद करण्यात आलंय.