
कुडाळ : बस कुडाळ डेपो येथे आली असता प्रवासी गुंडू सखाराम नाईक, रा. वेतोरे वेंगुर्ले याचा व कंडक्टर यांचा शिल्लक पैसे दहा रुपये वरून वाद झाला. त्याचे रूपांतर धक्का बुक्कित झाले. कंडक्टरच्या डोक्यास दुखापत झाली असून कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पुणे पणजी व्हाया कोल्हापूर वाहक किरण लक्ष्मण देवकुळे वय 46 रा. कोल्हापूर. एस टी बस क्रमांक MH 14- AQ 5938 गाडीचे वाहक होते. सदर बस ही कोल्हापूर व्हाया राधानगरी मार्गे कणकवली येथे आली असता प्रवासी घेऊन मार्गस्थ झाली. अधिक तपास पोलिस हे कॉन्स्टेबल गवस करत आहेत.