
कणकवली : तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणार्या सतरा वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा मुलगा आपल्या आत्येकडे राहत असे. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी आला. मात्र सायंकाळी तो घरात नसल्याचे लक्षात आले. शोधाशोध करूनही त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे या अल्पवयीन मुलाचे कोणीतरी फुस लावून अपहरण केल्याच्या मामे भावाच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.