
देवगड : देवगड तालुक्यात घराच्या खिडक्यांची तावदाने तसेच टीव्ही फोडल्याने पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील शामसुंदर विठ्ठल जोशी (वय ५३) यांच्या घराचे कंपाऊंड व व्हरांड्यामध्ये अनाधिकारी प्रवेश करून त्यांच्या आईला शिवीगाळ व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड येथील संशयित विशाल लाड (४५) व त्याच्या पत्नीविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १३ ऑगस्ट रात्री ९ वा. च्या सुमारास घडली असून दोन्ही संशयितांनी आपल्या घराच्या खिडक्यांची तावदाने व टीव्ही दगडाने फोडून सुमारे ५० हजारांचे नुकसान केल्याचेही श्री. जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांकडून कडून मिळालेल्या अधिक माहिती च्या आधारे फिर्यादी शामसुंदर जोशी यांच्या मुलगा व संशयित विशाल लाड यांच्यात वाकडीकपणा आहे.१३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास संशयित विशाल लाड व त्याच्या पत्नीने जोशी यांच्या घराचे कंपाऊंड व व्हरांड्यात अनाधिकारी प्रवेश केला. संशयितांनी जोशी यांच्या आईला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.संशयितांनी त्यांच्या घरांच्या खिडक्यांची तावदाने व टीव्ही दगडाने फोडला.यात जोशी यांचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले.याबाबत श्री. जोशी यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून देवगड पोलिसांनी संशयित विशाल लाड व त्याच्या पत्नीविरुद्ध भादंवि कलम ३२९ (४), ३२४ (४), ३५१ (२, ३), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार प्रवीण सावंत यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.