
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची रस्ता क्रॉस करताना असताना पाचदाºयाला धडक बसली. यात पादचारी विश्वनाथ लवू गावडे (४७, रा. वागदे-गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक महेश पंढरीनाथ राणे (५९ रा. सावंतवाडी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाºया कारची महामार्गालगत चालत जात असलेल्या पादचाºयाला धडक बसली. या धडकेत पादचारी विश्वनाथ गावडे हे जागीच ठार झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वागदे-गावठणवाडी येथे झाला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी महेश राणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे करीत आहेत.