
वैभववाडी : किरकोळ वादातून शहरातील एका व्यापाऱ्याला मारहाण झाली. हा प्रकार दुपारी ३वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे शहरात वातावरण तंग झालं आहे.
शहरातील बाजारपेठेत मोबाईल शॉपी मालकासोबत शहरातील फळ विक्रेता यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.हा वाद शहरातील काही लोकांनी आपापसात मिटविला. त्यानंतर शहरात भाईगिरी करणा-या एका तरुणाने येथे येऊन त्या मोबाईल शॉपी मालकाला बेदम मारहाण केली
या प्रकारानंतर त्या तरुणाच्या गावातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. भाईगिरी करणा-या त्या तरुणावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.












