मालवणच्या जंगलात मिळाला मृतदेह

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 28, 2025 11:26 AM
views 988  views

मालवण : तालुक्यातील नांदोस गावात जंगलात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत. हे वृत्त समजताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरु आहे.