
कुडाळ : ब्लू डार्ट गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी अटकेतील पाच जणाना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी दिली.
मुंबई गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलाजवळ 30 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री ब्ल्यू डॉटची गाडी पाठलाग करून अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुजल सचिन पवार वय 21, तेर्सेबांबर्डे, राहुल अमित शिरसाट, वय 19 कुडाळ, प्रशांत नितीन सावंत, वय 24, प्रज्वल नितीन सावंत, वय 21, वेताळ बांबार्डे, राहुल सदानंद नलावडे, वय 19 पावशी मिटक्याची वाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी होती पोलीस कोठडी संपल्यानंतर येथे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
तसेच यातील 17 वर्ष नऊ महिन्याच्या अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात आले. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील करीत आहेत.














