
कणकवली : गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी अजय हरिश्चंद्र कदम (४७, रा. कासार्डे, धुमाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून ३,३०० रुपयांची दारु जप्त केली.ही कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कासार्डे-धुमाळवाडी येथील जंगलमय भागात एका झाडाखाली केली. याबाबत पोलीस हवालदार स्वप्नील जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी अजय कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.