
देवगड : देवगड तालुक्यातील कोटकामते आयतनवाडी येथील एका जंगलमय भागातील झोपडीत तब्बल ४३ हजार २०० रूपये किंमतीचा गोवाबनावटीचा अवैध दारुसाठा बेवारस स्थितीत रविवारी सायंकाळी ६.३० वा. च्यासुमारास घटनास्थळी आढळून आला. हा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला असून अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती नुसार देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांना कोटकामते आयतनवाडी येथील एका जंगलमय भागातील झोपडीततब्बल ४३ हजार २०० रूपये किंमतीचा गोवाबनावटीचा अवैध दारुसाठा बेवारस स्थितीत रविवारी सायंकाळी ६.३० वा. च्यासुमारास घटनास्थळी आढळून आला. हा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला असून अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देवगडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे व कॉन्स्टेबल नितीन डोईफोडे यांनी केली असून घटनेची फिर्याद नितीन डोईफोडे यांनी देवगड पोलिसात दिली असून या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गणपती गावडे यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.














