
कणकवली : कणकवली पंचायत समिती मधील बांधकाम विभागातील कर्मचारी विद्याधर पवार यांनी कणकवली - आचरा रोडवर मारुतीमंदिर नजीक डॉ. बिले यांच्या दवाखान्यासमोर उभी केलेली होंडा कंपनी ची शाईन दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडली.
विद्याधर दुचाकी उभी करून दुकानात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून पुन्हा आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही दुचाकी न सापडल्यामुळे पवार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मोटरसायकल चोरीची फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार गुणिजन करत आहेत.











