नेर्ले येथे ९ बंद घरे फोडली

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 27, 2025 13:19 PM
views 1054  views

वैभववाडी : नेर्ले गावातील रावववाडी आणि पाटीलवाडी परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री ९ बंद घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी घरांची कुलपे तोडून आत प्रवेश केला व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पसरवून टाकले. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीसांना माहिती दिली असून पोलिसांचा पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या तयारीत आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पुन्हा चोऱ्यांचे सत्र वाढू लागल्याने पोलिसांनी ठोस पाऊले उचलण्याची मागणी होतं आहे.