
कुडाळ : विश्रांती घेण्यासाठी घरी आले आणि लाखाहून अधिक किमतीच्या गवंडी कामाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या 15 मशीन चोरून घेऊन गेले. ही घटना कुडाळ तालुक्यातील परप्रांतीय कामगारांशी संबंधित घडली. यानंतर संबंधित परप्रांतीय कामगारांने पोलीस स्टेशन गाठत आपली तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.
यातील परप्रांतीय कामगार पिंगुळी गावात राहत आहे. तो गवंडी कामाशी संबंधित सर्व प्रकारची कामे करतो. त्यामुळे त्याच्याकडे त्या संबंधित सर्व प्रकारच्या मशीन आहेत. दरम्यान त्याच्या घरी त्याच्या परिचयाचे दोन मित्र आले. हे पण गवंडी काम करतात. दरम्यान त्याने आपल्याला आज काम नसून तुझ्या खोलीत विश्रांती करतो असे सांगितले. मित्रानेही त्याच्यावर विश्वास ठेवत त्यांना तिथे राहण्यास देत आपल्या कामावर निघून गेला. दरम्यान कामावरून संध्याकाळी येऊन पाहतो तर घरात ठेवलेल्या सर्व मशीन गायब झालेल्या दिसल्या. यानंतर त्याने त्यांना फोन केला त्यातील एकाने आपण मस्ती घेऊन पळून गेलो असलेले सांगितले तुला काय करायचे ते कर असेही सांगितले. यामध्ये लादी कटिंग करणे, मोल्डिंग करणे, कलर संबंधित विविध प्रकारच्या मशीन अशा एकूण 15 मशीन चा समावेश होता.
या परप्रांतीय कामगाराने आपल्या भावाकडे दोन नवीन मशीन अलीकडेच मागवल्या होत्या. त्याही मशीन त्याने चोरून नेल्या. तसेच खोलीत असलेले पाच हजार रुपये रोख रक्कम त्यांनी चोरून दिली. मित्राने विश्वास ठेवून विश्रांती घेण्यास घर दिल्याचा त्यांनी चांगलाच मोबदला त्याला दिला. यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठत आपली तक्रार पोलीस स्थानकात दिली. याबाबत उशिरापर्यंत पोलीस स्थानकात कार्यवाही सुरू होती.