अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

युवकास बालकांच्या लैंगीक अत्याचार व ऍट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत अटक व कोठडी
Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 11, 2025 21:55 PM
views 655  views

कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याबाबत दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बु‌द्रुक) याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखवून अटक केली. ही घटना मागील चार महिन्यांच्या कालावधीत घडली असून पिडीत मुलीने मंगळवारी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार दीप याला मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. रूपेश देसाई यांनी काम पाहीले. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पिडीत मुलगी व संशयित दीप यांची स्नॅपचॅटच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात अनेकदा भेटी झाल्या. त्यात मागील चार महिन्यांच्या कालावधीत दीप याने मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगीक अत्याचार केले, अशी फिर्याद मुलीने कणकवली पोलिसांत दिली आहे. घटनेमध्ये ऍट्रॉसिटीचे कलम असल्याने तपास उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आडाव करत आहेत.