दोडामार्ग : तिलारी घाट मार्गे तात्काळ एसटी बस सेवा सुरु करा अन्यथा सोमावरी 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की तीलारी घाट मार्गे एसटी बस सेवा काही महिन्यांनपासून बंद केल्याने येथील गोवा सिंधुदुर्ग प्रवाशी, शाळकरी मुले यांना आर्थिक तसेच नाहक त्रास सोसावा लागत आहे. हा त्रास दूर करण्या साठी तात्काळ एसटी बस सुरु करा अशी वारवार मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचाकडे निवेदनाद्वारे केली होती. तरी देखील कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केला.
याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत एसटी बस सेवा सुरु करा अन्यथा सोमवार 7 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या उपोषणास तालुक्यातील सरपंच संघटना उपस्थित असणार असल्याचे गवस म्हणाले.