
कुडाळ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव जिल्हा परिषद गटात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माणगाव गटातील आकेरी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे माणगाव जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
आकेरी गावचे सरपंच महेश जामदार, उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मेस्त्री आणि बुथ प्रमुख अभय राणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, बंडया सावंत, राजू राऊळ, मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाई सावंत, रुपेश कानडे, पप्या तवटे, मोहन सावंत, राजा धुरी, अजय आकेरकर, साधना माडये, श्वेता लंगवे, रामचंद्र परब, दिपक काणेकर, अजय डिचोलकर, सुनिल बांदेकर, शशांक पिंगुळकर, तन्मय वालावलकर, अशोक कंदूरकर, सिताराम तेली, सोनू मेस्त्री, विजय वारंग, गुणाजी जाधव, संदेश वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पक्षप्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. माणगाव जिल्हा परिषद गटात भाजपला बळ मिळाल्याने, या गटातील निवडणुकीच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'उबाठा' सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने, माणगाव गटातील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपच्या उमेदवाराचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत










