
कणकवली : साळीस्ते येथे आढळलेलातो मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा खून 'प्रॉपर्टी'च्या कारणांतून झाला असल्याची माहिती पोलिसी सुत्रांकडून प्राप्त होत आहे. श्रीनिवास रेड्डी हे गर्भश्रीमंत होते व ते अविवाहित होते, अशी ही माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे. बेंगलोर परिसरात त्यांची मोठी प्रॉपर्टी आह. याच कारणातून हा खून झाला असावा, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. दरम्यान कणकवली पोलिसांचे पथक बेंगलोर येथे पोहोचले. श्रीनिवास रेड्डी यांच्या पश्चात फक्त आई असून ती देखील डॉक्टर आहे. त्यांची आई येत्या एक ते दोन दिवसांमध्ये कणकवलीला येणार आहे, अशी ही माहिती पोलिसांनी दिली.










