LIVE UPDATES

निवडणूक ओळखपत्र नसेल तरीही करू शकता मतदान

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 26, 2024 14:40 PM
views 487  views

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यामध्ये २० ऑक्टोबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर मतदार त्यांची ओळखपत्र पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील, जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करून शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतात, अशी माहिती उप जिल्ला निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली.

आधार कार्ड, मनरेगा जाँच कार्ड, बैंक पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिष्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याव्दारे नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मयांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र याप्रमाणे मतदानाच्यावेळी विविध प्रकारची निश्चित करुन देण्यात आलेली ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येणार आहे, असे निवडणूक अधिकाऱ्याऱ्यांनी स्पष्ट केले आहे.