नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतरही शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाकडे सात खासदार असूनही पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. फक्त राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कारभार देऊन बोळवण करण्यात आल्याची टीका शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्र्यांसह ७२ जणांना रविवारी शपथ देण्यात आली. त्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) करण्यात आले. शिंदे गटाने एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री अशा दोन मंत्रीपदांची मागणी केली होती.