विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 16, 2025 13:41 PM
views 371  views

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडीचे सुपुत्र तथा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सिंधुदुर्गात येतायत. शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 ला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.05 वाजता  मोपा विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव. दुपारी  12 वाजता मोटारीने मातोंड, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता मातोंडा ता. सावंतवाडी येथे आगमन व देवस्थान सदिच्छा भेट. दुपारी 3 वाजता मातोंडा, ता. सावंतवाडी येथून मोटारीने माडखोल सावंत फार्म ॲण्ड अग्रो टुरिझम, सावंतवाडीकडे प्रयाण व या ठिकाणी आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग प्रेस क्लब वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती व राखीव.  दुपारी 4 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने पेंडूर ता. मालवणकडे प्रयाण. सायं. 5 वाजता पेंडूर ता. मालवण येथे आगमन व राखीव. श्री. वेताळ देवस्थान ट्रस्ट, पेंडूर आयोजित देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.30 वाजता पेंडूर ता. मालवण जि.सिंधुदुर्ग येथून मोटारीने मोपा विमानतळ गोवाकडे प्रयाण.