तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य नाहीत..

शाहंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
Edited by:
Published on: July 22, 2024 05:32 AM
views 427  views

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब‘ आहे आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते हे उद्धव ठाकरे आहेत, अशी बोचरी टीका अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आता अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही. आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचं नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिलं आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.