
सिंधुदुर्गनगरी : सरकार उलथवून टाकण्याची ताकद कर्मचारी संघटना मध्ये आहे, ती वेळ येऊ देऊ नका, असा इशारा थेट राज्य सरकारला देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी भवनावर भव्य मोर्चा नेत संघटनात्मक एकीची ताकद दाखविली. जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असा इशारा देत सिंधुर्गातील 57 कर्मचारी संघटनांनी मोर्चा आणि धरणे आंदोलनात सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला असून सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. महसूल कर्मचारी शिक्षक आरोग्य सेवक नर्सेस जिल्हा परिषद कर्मचारी ग्रामसेवक तलाठी आधी सर्वच सवर्गातील यात सहभाग घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची ताकत पुन्हा एकदा दिसली.
सिंधुदुर्ग नगरी येथे मंगळवारी जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या भव्य मोर्चा सहभाग घेतला. श्री देव रवळनाथ मंदिराकडून या मोर्चा प्रारंभ झाला. हा मोर्चा सिंधुनगरीतील जिल्हाधिकारी भावनावर थडकला. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना या मोर्चेकरी शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. समन्वय समितीचे नेते तसेच विविध कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष यांनी या मोर्चाचे व शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. जिल्हा परिषद भवना समोरही घोषणाबाजी झाली. जुनी पेन्शन आमच्या हक्काची अशा घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दुमदुमून गेली.
जुनी पेन्शन योजना सर्वच कर्मचाऱ्यांना लागू करावी यासाठी सर्वच प्रवर्गाच्या कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली एकवटल्या आहेत. मंगळवारपासून संपात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. संपा आंदोलनामुळे सरकारी कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे. सोमवारी सरकारशी बोलणी फिस्कटल्यामुळे राज्यव्यापी कर्मचारी मध्यवर्ती संघटना संपावर ठाम राहिले आहे. राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्व कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांचेही लक्ष लागून राहिल्या आहेत.

ताजी बातमी
View all





संबंधित बातम्या
View all

























































































































































































































































































































