
मुंबई : बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे, ढगांच्या गडगटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांत गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात ४० ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वादळी वारे वाहून ढगांच्या गडगटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा आणि गारपिटीचा जोर जास्त राहील.