आमचं ठरलंय..आपला माणूस, आपला खासदार !

कार्यकर्त्यांकडून नारायण राणेंचे स्टेटस व्हायरल !
Edited by: भरत केसरकर
Published on: April 02, 2024 06:51 AM
views 601  views

सिंधुदुर्ग : आपलं ठरलंय.. आपला माणूस.. आपला खासदार.. अशा आशयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्टेटस सध्या अनेक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर आहेत. तर चौफेर विकासाचं.. विश्वासाचं.. आपुलकीचं.. सर्वसामान्यांचं.. नेतृत्व यावर नारायण राणे यांचा फोटो असणारे स्टेटस राणे समर्थकांच्या मोबाईलचे स्टेटस बनले आहेत.

त्यामुळे भाजप कार्यकर्त्यात सध्या मोठा विश्वास नारायण राणे यांच्या बद्दल वाढला आहे. त्यामुळे उमेदवारीची घोषणा केव्हा होते याकडेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.