विभाग नियंत्रकांच्या मनमानीविरोधात मंत्री नितेश राणे आक्रमक

सेवा शक्ती एस टी कामगार संघाच्या लढ्याला अखेर यश
Edited by:
Published on: March 18, 2025 11:22 AM
views 780  views

मुंबई : पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानभवन मुंबई येथे सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभाग यांच्या मागणीवरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विभाग नियंत्रक श्री घुले, आणि विभागीय वाहतुक अधिकार श्री देशमुख यांच्या गलथान कारभाराबाबततसेच कामगार वर्ग, प्रवाशी समस्या व प्रशासकीय कामकाज या बाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

या बैठकीसाठी सिंधुदुर्ग विभागातील सर्व अधिकारी यांना उपस्थित ठेवण्याची मागणी  सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार विभाग नियंत्रक श्री घुले, विभागीय वाहतूक अधिकारी श्री देशमुख यांच्यासमवेत  MEO श्री डोंगरे, DTS निलेश लाड, DPO कलकुटकी, बांधकाम अभियंता केंकरे, हे उपस्थित होते, तसेच परिवहन आयुक्त श्री विमलवार, परिवहन सचिव, यांच्या सहित रा. प. चे महाव्यवस्थापक कवऔस, महाव्यवस्थापक वाहतूक, प्रादेशिक व्यवस्थापक जोशी इत्यादी उपस्थित होते.

 या वेळी स्वतः मंत्री नीतेश राणे पालकमंत्री, यांनी श्री घुले व श्री देशमुख यांच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला. हे दोघेही जिल्ह्यात उपस्थित नसतात, गैरहजर असतात, कधीतरी हजर असतात त्यावेळी मुख्यालयात येत नाहीत, कामचुकार पणा करतात एकंदरीत सिंधुदुर्ग विभागातील एसटीचे पूर्ण कामकाज ठप्प झालेले आहे. त्याचप्रमाणे संघटनेमार्फत सादर केलेल्या मागणीनुसार नविन गाड्या तात्काळ मिळाव्यात,वैभववाडी येथे आगार व्हावा, बसस्थानके नूतनीकरण, तसेच चालक वाहक कमतरता असल्याने कंत्राटदार कामगीरी केलेल्या बेकार तरुणांना नियुक्त्या देणे, विलंब झालेले एप्रेंटिस शिपचे कार्यशाळा कर्मचारी नियुक्ती देणे. इत्यादी बाबींवर चर्चा झाली, विभागनियंत्रकानी केलेल्या चुकीच्या बदल्या रद्द करणे, विनंती बदली, आपापसात बदली तात्काळ करणे, वेंगुर्ला व विजयदुर्ग येथील स्थानक प्रमुख यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या बदल्या करणे, अपराध कारवाई अंतर्गत झालेल्या बदल्या पूर्ववत आगारात करणे. DC व DTO यांच्याबाबत तातडीने कठोर निर्णय घेणे इत्यादी बाबत चर्चा झाली, परिवहन मंत्री यांनी तात्काळ आजच सायंकाळी पाच वाजता परिवहन आयुक्त, परिवहन अधिकारी, एस टी चे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक आयोजित करून सर्व विषयांवर आजच निर्णय घेण्याबाबत आदेश दिले.

  या वेळी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत, सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे जिल्हा संयोजक, तसेच भाजपा जिल्हा कामगार मोर्चाचे अध्यक्ष अशोक राणे, राज्य कार्यकारणी सदस्य रोशन तेंडूलकर, सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सदस्य प्रशांत गावडे, विभागीय सदस्य महादेव भगत उपस्थित होते . 

सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व परिवहन आयुक्त श्री विमलवार यांचे संघाच्या सिंधुदुर्ग शाखेने विशेष आभार मानले, असे  सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे  विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.