जरांगेंच्या पाठीशी कोण ? ; मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही

राज ठाकरेंचा दावा
Edited by: ब्युरो
Published on: November 16, 2023 15:53 PM
views 447  views

मुंबई : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.  25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

मराठा समाजाला कधीही आरक्षण मिळणार नाही, हे त्यांना त्यांच्या समोर सांगून आलो होतो, मनोज जरांगे पाटील स्वत: बोलतायत की त्यांचा बोलावता धनी कोण वेगळा आहे, यातून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण निवडणूका तोंडावर असताना या सर्व गोष्टी होतायत हे काय सरळ चित्र दिसत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.