ब्युरो : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. मात्र आता अधिवशेन संपताच याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे.
लाडकी बहिण योजनेत 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेसाठी 3500 कोंटीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे.