आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबरला कोकण दौऱ्यावर

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 20, 2023 19:26 PM
views 351  views

कुडाळ : शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 


23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता खळा बैठकीचे आयोजन दोडामार्ग तालुक्यात लीना कुबल यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. तर दुपारी 12:25 वाजता सावंतवाडी वेंगुर्ला तालुका या तीन तालुक्यांच्या खळा बैठकीचा आयोजन श्री चंद्रकांत कासार यांच्या निवासस्थानी सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. तर दुपारी 1:40 मिनीटांनी कुडाळ वेताळ बांबर्डे येथे स्नेहा दळवी यांच्या निवासस्थानी  खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


 तर कणकवली तालुक्यात शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या निवासस्थानी दुपारी 3:00 वाजता कणकवली वैभववाडी देवगड तालुका यांच्यासाठी खडा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून याच ठिकाणी पत्रकार परिषद पार पडणार आहे. तर त्यानंतर  रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात प्रफुल्ल लांजे कर यांच्या निवासस्थानी राजापूर तालुका खळा बैठक होणार आहे. तर रत्नागिरी तालुक्याची खळा बैठक विनोद सीतम यांच्या निवासस्थाने होणार आहे. तर त्यानंतरचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे