झुआरीचा आलेख नेहमी उंचावतच राहील : सुरेश दळवी

Edited by: संदीप देसाई
Published on: March 13, 2024 05:57 AM
views 104  views

दोडामार्ग : झुआरी फार्महब कंपनी शेतकऱ्यांच्या हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण आहे. या कंपनीन शेतकरी मित्रांसाठी आयोजित केलेले हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर शेतकऱ्यांचा मनात अधिक आपुलकीचं नात वृध्दींगत करेल असा विश्वास लोकनेते तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुरेशभाई दळवी यांनी दोडामार्ग येथे व्यक्त केला.  झुआरी जंक्शन दोडामार्ग येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

    सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे. चांगली शरीर संपत्ती जतन करण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. परंतु बदलत्या जीवन शैलीमुळे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. हे धोके न परवडणारे व अत्यंत खर्चिक असल्याचे डॉ. रेडकर यांनी स्पष्ट केले. तर शेतकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर राबविण्याची  संकल्पना गरजेची होती आणि ती झुआरीने पूर्ण केली आहे असे मत कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यक्त केले आहे तसेच दोडामार्ग पोलिस निरीक्षक ओतारी साहेब यांनी आपल्या सुंदर अशा कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्याला शेतकऱ्यांनीही दाद दिली. झुआरी जंक्शन दोडामार्ग येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात रक्तदाब हिमोग्लोबिन शुगर सर्दी खोकला आदी आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तर मधुमेह मूळव्याध हृदयविकार याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, कृषी अधिकारी एम कोळी, ऍड सोनू गवस, झुआरीचे व्यवस्थापक मंदार सावईकर, प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर देसाई, संदीप गवस आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले. प्रास्ताविक मंदार सावईकर आभार शुभम सातार्डेकर यांनी  मानले.  सुयश गवस प्रवीण राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.