
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची बदली झाली असून मुंबई येथील हाफकिन बायो फार्मा कोर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रवींद्र खेंबूडकर यांची नियुक्ती झाली आहे. सध्या ते विधानपरिषद उपसभापती यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत आहेत.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची गोदीया जिल्हाधिकारी पदी बदली झाल्यानंतर 6 फेब्रुवारी 2024 रोजी मकरंद देशमुख यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली होती त्यानंतर एक वर्षातच देशमुख यांची मुंबईत बदली झाली आहे.
जिल्हा परिषदेवर सद्या लोकनियुक्त बॉडी नसल्याने प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हेच प्रशासकीय कारभार संभाळत होते त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी अनेक वेळा नाराजीही व्यक्त केली होते अखेर एक वर्षातच त्याची बदली झाली आहे