
सिंधुदुर्गनगरी : एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झालेले जिल्हा परिषदेचे विद्यार्थी विमानाने इस्त्रोला जाण्यासाठी निघाले. त्यांना जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर , जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी शुभेच्छा दिल्या.
हे सर्व विद्यार्थी पुढील चार दिवस प्रवासात राहणार आहेत. ते विद्यार्थी गोवा दाभोळी विमानतळावरून विमानाने तिरुअनंतपुरम निघणार आहेत . त्यानंतर इस्त्रो येथे पाहणी केल्यावर कन्याकुमारी येथील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे तसेच काही शिक्षक आणि पालक राहणार आहेत.