जिल्हा बँकेच्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे शुक्रवारी शानदार उद्घाटन !

युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन तर पारितोषिक वितरण निलेश राणे यांच्या हस्ते
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 10, 2022 18:28 PM
views 349  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा दि.  ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ओंकार डिलक्स, हॉल येथे आयोजित केली आहे. सदर कार्येक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांचे हस्ते करणेत येणार आहे. तर पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ३.३० वा मा.खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, श्री गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, सौ. नीता राणे, प्रकाश मोर्ये, तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ, प्रमोद गावडे, जिल्हा बँक मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.   

या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील १२० मूर्तीकारांनी सहभाग नोदवला असुन जिल्ह्यातील गणेश भक्तांना १२० अप्रतिम कलाकृती पहाण्याची संधी लाभणार आहे. शनिवारी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण भेट देणार आहेत. तसेच १२ नोव्हेबर व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी अक्षय मेस्त्री, घोडगे, सिध्देश तेली, परूळे यांना मूर्तिकाम प्रात्यक्षिकांसाठी निमंत्रित करण्यात आले असुन गणेश भक्तांना या दोन दिवशी गणेशमूर्ती घडत असतानाचे प्रात्यशिक पहाता येणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील गणेश भक्तांनी बहूसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केली आहे.