
दोडामार्ग : माध्यमिक विद्यालय झोळंबे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक परब व बी. एन. काटकर हे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणून निवडून आल्यानंतर माध्यमिक विद्यालय झोळंबे येथे शालेय समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एकनाथ नाईक गावडे सर, दिपक गवस, शेटकर व कोळापटे, शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.