आरईएस करंडकाची मानकरी ठरले झेप 2024 मधील नृत्य विभाग

Edited by:
Published on: December 24, 2024 19:21 PM
views 139  views

रत्नागिरी :  रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित "झेप 2024" या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाने उत्साहाने रंग भरले. या महोत्सवात विविध कला आणि गुणांचे प्रदर्शन झाले आणि त्यातून कौशल्याशी जळले नाते...ब्रीद वाक्य असलेला आर.ई.एस. करंडकासाठी  सात कला प्रकारामध्ये एकूण ११४५ कला प्रकारामध्ये स्पर्धक सहभागी झाले होते .कला प्रकारातील सहभाग आणि व्यवस्थापन कौशल्य यावर आधारित अतिशय चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.

आर.ई.एस. करंडकातील अंतिम मानकरी ठरलेले विभाग :

पहिला क्रमांक :  झेप 2024 च्या नृत्य विभागाने जबरदस्त सादरीकरण करत आर.ई.एस. करंडकाची मानकरी ठरली! गायत्री मांगले आणि टीम ने अतिशय दिमाखदार कार्यक्रम सादर केले.

तिसरा क्रमांक: वाङ्मय विभागाने आपली प्रभावी सादरीकरणे सादर करत तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.

दुसरा क्रमांक: उद्योजकतेच्या विभागाने उत्तम स्टॉल्स आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसह दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी तर्फे देण्यात येणाऱ्या स्पर्धेला फिरता करंडक आणि १००००/- पारितोषिक देण्यात येते. या वर्षीचा आर.ई.एस. करंडक नृत्य विभागाच्या नावावर जमा झाला असून त्यांनी सोलो, गट नृत्य, लोकनृत्य, आणि वेस्टर्न डान्सच्या अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्यांच्या सृजनशीलतेने आणि ऊर्जा-भरलेल्या सादरीकरणाने झेप 2024 ला एक वेगळाच आयाम मिळवून दिला. परीक्षक म्हणून शुभम रसाळ , गौरव बंडबे, आणि गौरी साबळे यांनी काम केले. सर्व परीक्षकांना झेप महोत्सवामध्ये प्राचार्य डॉ मकरंद साखळकर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

"झेप 2024" हा महोत्सव फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरीसाठी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. "झेप 2024" चा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक प्रतिभेला वाव देणारा व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. झेप महोत्सव समन्वयक डॉ आनंद आंबेकर , विद्यार्थी सचिव मिहिका केनवडेकर आणि कोअर कमिटी आणि विद्यार्थी मंडळ खुप मेहनत घेतली आहे. 

 रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सह कार्यवाह प्रा.श्रीकांत दुदगिकर, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम उपस्थित होते.