झाराप पत्रादेवी रास्तारोको आंदोलन 5 जूनला ; रुपेश राऊळ यांचं सहभागी होण्याचं आवाहन

Edited by: विनायक गावस
Published on: June 04, 2023 15:22 PM
views 125  views

सावंतवाडी : झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर नेमळे, मळगाव, वेत्ये परिसरात अपघाताचे सत्र सूरुच असून २९ मे रोजी नेमळे ग्रामपंचायत मध्ये संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश खटी, कांबळे, साळूंके तसेच सावंतवाडी पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे यांना बोलावून महामार्गावर अपघात कशामुळे होतात याला जबाबदार कोण ? याविषयी अधिकाऱ्यांना नेमळे ग्रामापंचायतीमध्ये सूचना दिल्या. तसेच सात दिवसांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना न राबविल्यास रास्तारोको करणार असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले. असे असतानाही मळगाव नेमळे वेत्ये हद्दीमध्ये अपघात सुरूच आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना अद्याप राबवलेली नाही किंवा दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे 5 जून 2023 रोजी सकाळी ठिक ११वा झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्ग बंदचे आंदोलन होणार आहे. सर्व नेमळे व मळगाव  वेत्ये ग्रामस्थानी या आंदोलनात सहभागी व्हावे अस आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ तसेच नेमळे ग्रामस्थांनी केली आहे.