युवराज लखमराजे सावंत - भोंसले यांचा भाजपा सिंधुदुर्गच्यावतीन गौरव..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 16, 2023 18:49 PM
views 255  views

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या सेनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत - भोंसले यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्यावतीन गौरव करण्यात आला. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्या दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुस्तक देऊन युवराजांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चंदन धुरी, गुरूनाथ पेडणेकर, बाळू देसाई, चंद्रकांत जाधव आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.