युवासेना उबाठा तालुका प्रमुखपदी ॲड. कौस्तुभ गावडे !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2024 06:13 AM
views 413  views

सावंतवाडी : युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख पदी ॲड. कौस्तुभ गावडे यांची निवड करण्यात आली. उबाठा शिवसेनेचे नेते तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना कार्यकारणी सदस्य रुची राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, यांच्या शिफारसीनुसार शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सर्वांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी, उपनेत्या जान्हवी सावंत उपस्थित होत्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खा. विनायक राऊत यांना अभिप्रेत असलेले काम करेन असे ॲड. कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.