
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात युवासेनेच्यावतीनं शक्तिप्रदर्शन करत महाविद्यालये कॉलेज कक्ष स्थापना आणि अनावरण करण्यात आले. युवासेना सचिव वरूण सरदेसाई, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शहरातील दोन महाविद्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली.
यावेळी युवा सेना सचिव वरूण सरदेसाई म्हणाले, विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी युवासेना कार्यरत आहे. यापुढे देखील कार्यरत राहील. त्याकरीता महाविद्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर रोजगाराचा प्रश्न जटील असून त्यासाठी युवासेना प्रयत्नशील राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार, खासदार त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, उद्योगमंत्री कोकणातील असून उद्योग बाहेर जात आहेत अशी टीका वरूण सरदेसाई यांनी केली.
यावेळी खासदार विनायक राऊत, अतुल रावराणे, संजय पडते, रुची राऊत, गुणाजी गावडे, सागर नाणोसकर, योगेश राऊत आदींसह युवासेना, उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










