
कुडाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवा सेनेच्या कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
राजवीर पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. युवा वर्गाला एकत्र करून शिवसेनेचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
राजवीर पाटील यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी काळात ते युवा सेनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या जबाबदारीबद्दल राजवीर पाटील यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, युवा सेना प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू, अशी ग्वाही दिली आहे.










