
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भव्य युवासेना मेळावा कुडाळ येथे २० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्याच्या निमित्ताने वेंगुर्ला युवासेनेची आढावा बैठक शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीला युवासेना कोकण निरीक्षक राहुल अवघडे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल गावडे, युवासेना शहर प्रमुख सागर गावडे, युवतीसेना प्रमुख योगिता कडुलकर अणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीचा पण आढावा घेण्यात आला. युवा सेना पूर्ण ताकदीने या निवडणुकीत काम करेल असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी व्यक्त केला. या वेळी कोकण निरीक्षक राहुल अवघडे यांच्या काढून माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे तसेच सचिन वालावलकर, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे युवासेनेला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना आणि उपस्थितीतांचे आभार युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल गावडे यांच्या काढून करण्यात आले.










