
कुडाळ : आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे.ज्या-ज्या गावात आमदार वैभव नाईक पोहोचतात त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.आज कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ. वैभव नाईक हे सर्व सामान्य जनतेमध्ये वावरुन सर्वसामान्यांच्या वेळप्रसंगाला धावुन जाणारे आमदार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आ.वैभव नाईक सातत्याने करतात.एक हक्काचे आमदार म्हणून आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून त्याच विश्वासातून आम्ही ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेशकर्ते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विशाल परब, मनोज माणगावकर,निकिता राणे,प्रतिक राणे,संध्या माणगावकर,अनिकेत सावंत, जयदीप सावंत, हेमंत मेस्त्री,ताता पालव,महेश धुरी, ऋषिकेश धुरी,कृष्णा आकेरकर, सचिन आकेरकर, प्रथमेश आकेरकर,गौरव नाईक,तृप्ती आईर,मनोज सावंत या युवकांनी व युवतींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी माजी जि. सदस्य रमाकांत ताम्हणेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर,आकेरी सरपंच महेश जामदार, उपसरपंच गुरुनाथ पेडणेकर, विभाग संघटक कौशल जोशी, ग्रा.प. सदस्य प्रमोद घोगळे, सुर्या घाडी, शाखाप्रमुख उमेशकुमार परब, शाखाप्रमुख बाळा राणे, उपशाखाप्रमुख अभय राणे,महादेव परब, रुपेश वारंग,गिरीश सावंत,सूर्यकांत जाधव, संतोष गावडे, सचिन पालव, रुपाली पेडणेकर,राजेश मेस्त्री, सिद्धेश परब, निलेश केसरकर,सुहास सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.










