युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक सावंतवाडीत

युवासेना बळकट करण्यासाठी युवा सैनिकांशी संवाद
Edited by: विनायक गांवस
Published on: February 15, 2025 17:15 PM
views 224  views

सावंतवाडी : युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सावंतवाडी येथे भेट देत युवा सैनिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी युवा सेनेच्या बैठकीस उपस्थित राहत युवकांना मार्गदर्शन केले. आम. राणेंच श्री. सरनाईक यांनी स्वागत केले. यावेळी युवासेना अधिक बळकट करण्यासाठीची चर्चा त्यांच्यात झाली. निश्चितच युवासेना अधिक सक्षम होईल असा विश्वास श्री. सरनाईक यांनी व्यक्त केला. 

युवा विजय महाराष्ट्र दौऱ्या निमित्त युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक सावंतवाडीत आले होते. त्यांनी सावंतवाडी विधानसभेतील पवित्र श्री बांदेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी कोकणात शिवसेना पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा केली. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीनही विधानसभांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक पार पडली. युवासेना अधिक बळकट करण्यासाठी सखोल चर्चा झाली. प्रत्येक पदाधिकाऱ्याचा उत्साह आणि कार्याबद्दलची बांधिलकी पाहून निश्चितच युवासेना अधिक सक्षम होईल, असा विश्वास श्री. सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या बैठकीस उपस्थित राहत युवा सैनिकांची भेट घेत मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.