युवा सेनेतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

खा. विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 22, 2023 19:20 PM
views 198  views

देवगड : देवगड पडेल येथे कणकवली विधानसभा युवा सेनेच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शनिवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत पडेल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत,अतुल रावराणे, तालुकाप्रमुख मिलिंद,साटम जयेश नर, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून आतापर्यंत शिरगाव,फणसगाव,वैभववाडी, कणकवली,कनेडी या भागांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये 300 हून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आतापर्यंत एक हजाराहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. तरी समारोप शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख फ़रीद काझी यांनी केले आहे.