अनुभव शिक्षा केंद्राच्या तरुणाईने जाणून घेतलं न.पं.चं काम

Edited by:
Published on: May 20, 2025 11:58 AM
views 54  views

मालवण : अनुभव शिक्षा केंद्रामार्फत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे चालू असलेल्या युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स मधील तरुणाईने नगरपंचायत मालवण येथे भेट दिली. नगरपंचायतिच्या विविध विभागांविषयी माहिती जाणून घेतली. 



यावेळी मुख्याधिकारी संतोष जिगरे, मा. गवळी, दिनेश राऊत, विभागीय समन्वयक आसमा, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, दरक्षा शेख, विशाल गुरव उपस्थित होते. नगरपंचायत येथे भेट देत असताना त्यामधील जे विभाग आहेत त्यांची माहिती घेतली. सर्वप्रथम सहदेव पाटकर यांनी आपण अनुभव शिक्षा केंद्र आणि आपण भेट का देत आहोत हे मुख्याधिकारी यांना स्पष्ट केल. गवळी यांनी स्वागत करून नगरपंचायत बनण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता असणे आवश्यक आहे हे सांगितले. युवांचे जे प्रश्न होते त्यावर मुख्याधिकारी यांनी संवाद साधला. सोबतच मा. राऊळ यांनी कर्मचारी भरतीबाबत सांगितले.

ज्या रिक्त जागा असतील त्यावर पात्रतेनुसार भरती केली जाते. त्याची प्रक्रिया काय आहे हे स्पष्ट केले. कोर्स मधील प्रशिक्षणार्थी यांनी प्रत्येक विभाग येथे जाऊन माहिती घेतली. युवांमधील उत्साह पाहून नगरपचायत मधील सहकाऱ्यांनी तितक्याच जोमाने संवाद साधला. नगरपंचायतचे विशेष काम पाहून युवक भारावून गेले.