
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा तरुण १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना ध्रुवराजला शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा २१ वर्षांचा असून, तो भैरववाडी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहे. त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास, कृपया तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्कासाठी क्रमांक:
पी. आय. राजेंद्र मगदूम: 7387687888
एच. सी. ९८ प्रमोद काळसेकर: 8605724105
एच. सी. ४०५ महेश भोई: 9404775727
कुडाळ पोलीस ठाणे: 02362 - 222533
श्री. सुनील तुकाराम राऊळ (मुलाचे वडील): 9405545599
माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे कुडाळ पोलीस ठाण्याकडून कळवण्यात आले आहे.