कणकवलीत शुक्रवारी युवा प्रेरणा मेळावा

मंत्री नितेश राणे, प्रमोद जठार, प्रभाकर सावंत उपस्थित राहणार
Edited by:
Published on: May 29, 2025 19:22 PM
views 53  views

संदीप मेस्त्री यांची माहिती 

कणकवली ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा यांच्यावतीने शुक्रवार 30 मे रोजी सकाळी 10 वाजता येथील प्रहार भवन येथे युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने समाजातील यशस्वी महिलांचा सन्मान मेळाव्यात होणार आहे, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली. 

या मेळाव्यात नियोजनाबाबत खा.नारायण राणे संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, सरचिटणीस संतोष पुजारे, युवा मोर्चाचे कणकवली तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, वैभववाडी तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, देवगड तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, शहराध्यक्ष सागर राणे, समीर प्रभुगावकर, गणेश तळगावकर, मकरंद सावंत, प्रशांत राणे, अक्षय पाटील, चिन्मय तळेकर, मंदार सोगम, सिद्धेश वालावलकर, ऋतिक नलावडे, अवधूत तळगावकर, सचिन गुरव, बाबू राणे, नयन दळवी, सोमनाथ चव्हाण, मंदार मेस्त्री, श्रेयस चिंदरकर, रोहित ठाकूर, सर्वेश बागवे उपस्थित होते.