
दोडामार्ग : तालुक्यातील झोळंबे येथील युवक वैभव गुरुदास भिडे ( वय २५ ) याचा कुळण-सर्वण येथील श्री योगेश्वरी मंदिराच्या सभा मंडप परिसरात विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुळण येथे पौर्णिमेनिमित्त योगेश्वरी मंदिरात देवीचा पालखी उत्सव सुरू होता, अशी माहिती देण्यात आली. या ठिकाणी वैभव हा काहीतरी दुरुस्ती काम करत असताना त्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. आणि तो जमिनीवर कोसळला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने त्याला डिचोली आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी वैभव याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.