जामसंडे सोहनी वाडीतील युवक अपघातात मृत्यूमुखी

Edited by:
Published on: January 13, 2025 20:27 PM
views 151  views

देवगड : जामसंडे सोहनीवाडी येथील रुपेश नंदकुमार कदम (४२) या युवकाचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला आहे.हि घटना सोमवारी दु.१.१५ च्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक वृत्ता नुसार देवगड तालुक्यातील जामसंडे सोहनीवाडी येथील रुपेश नंदकुमार कदम(४२) हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल एम एच०७-ए क्यू ३७४५ घेऊन कुणकेश्वर हुन देवगड कडे येत असताना कुणकेश्व हायस्कुल समोरील रस्त्यावर त्यांचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने गाडी स्लिप झाली व अपघात झाला.या अपघातात त्यांच्या डोकिस गंभीर दुखापत होऊन त्यात ते मयत झाले.

सदरची माहिती मिळतात देवगड किल्ला देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव पोलीस कॉन्स्टेबल श्री नाटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.अपघाताचे वृत्त समजताच उद्योगपती नंदकुमार घाटे,नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, तसेच देवगड किल्ला सोहनी वाडी ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या अपघाता बाबत मोटरसायकल स्वारावर बी एन् एस कलम १०६(१)१२५(A)१२५(B),२८१,,मोटर वाहन अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव करीत आहेत, या घटनेची माहिती प्रकाश नंदकुमार कदम यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली.