
वैभववाडी : मूळ विजापूर (कर्नाटक) येथील कामगार गोपी थायरू चव्हाण हा बुधवार दिनांक ८ मार्च पासून वैभववाडीत राहत असलेल्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याची पत्नी कविता चव्हाण हिने पोलिसांत दिली आहे.
विजापूर येथील चव्हाण दाम्पत्य हे कामासाठी वैभववाडीत आहे. येथील गोपाळनगर येथे ते राहतात.बुधवारी सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास गोपी घरातून निघून गेला. त्यानंतर रात्री त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी दिवसभर त्याचा शोध घेतल्यानंतर सायकांळी उशिरा बेपत्ताची तक्रार पत्नी कविता हिने पोलीसांत दिली आहे.